Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्युसह 11 कोरोनामुक्त तर 29 नवीन कोरोना बाधित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 23 जून : आज जिल्हयात 29 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 11जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30150 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29184 वर पोहचली. तसेच सद्या 227 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 739 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 50 वर्षीय पुरुष अक्सापूर ता.गोंडपिपरी जि.चंद्रपूर येथील एकाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.80 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.75 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 29 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 08, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 08, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 03, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 03, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 06 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 11 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 02, अहेरी 01, आरमोरी 02, भामरागड 00, चामोर्शी 03, धानोरा 00, एटापल्ली 02, मुलचेरा 00, सिरोंचा 01, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा  :

मोठी बातमी : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट

महाविद्यालयीन युवकांना राजे धर्मराव महाविद्यालयाकडून रोजगाराची दूसरी संधी

आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा २५ जून ला सन्मान

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.