स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे काम करून ‘ती’ करते कुटुंबाचा उदरनिर्वाह

आई ही देवाची सर्वात सुंदर निर्मिती आहे, जी आयुष्यभर कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्या मुलांवर प्रेम करते आणि त्यांना प्रत्येक सुख-दु:खात साथ देते. म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अशी आईची तुलना कुणाशीही करता येत नाही. जी आई मुलांना जन्म देते. तीच आई स्मशानभूमीत कुठलीही भिती न बाळगता अंत्यसंस्काराचे अनेक सोपस्कार पार पाडते.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड : नांदेड जुन्या शहरातील रामघाट या स्मशानभूमीतीत गेल्या नऊ वर्षापासून मोठ्या धाडसानं आणि ध्येर्याने ही महिला कोरोना काळातही सरन रचन्या पासून चे अंत्यसंस्कारानंतरची राख साफ करण्यापर्यंतचे काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

परमिंदर कौर ज्या स्मशानभूमीत काम करते त्याच ठिकाणी त्यांचे वास्तव सुद्धा आहे. ती आपल्या ६५ वर्षाच्या सासू, पती, एक मुलगा आणि एक मुलीसह राहतात. मूळच्या पंजाबच्या अमृतसर मधून नांदेड आलेल्या आणि मागील नऊ वर्षांपासून स्मशानभूमीतीच आपल्या कुटुंबासोबत राहतात. परमिंदर कौर या स्मशानभूमीत अंतसंस्कार नोंदणी, सरण रचने, राख काढणे अशी सर्व कामं करतात. तुटपुंज्या मानधनात परमिंदर कौर या संसाराचा गाडा हाकत आहे.

स्मशानभूमी म्हंटलं की मनात धडकी भरते अशा ठिकाणी परमिंदर कौर वास्तव्य करते. एका खोलीच्या पत्राच्या शेड मध्ये आपला संसार करते. त्याशेड मध्ये एक लाईट तिथेच किचन तिथेच बेड आहे. परमिंदर यांचा पूर्ण परिवार एकाच शेड मध्ये राहतात. परमिंदर कौर ह्या अंत्यसंस्काराचे सर्व कामे करतात. तीच्या या कामात पती गुरुदेवसिंघ मल्ली आणि त्यांचा मुलगा ही सहकार्य करतात.

परमिंदर कौर यांच्या धेर्याला दाद देत रामघाट चे व्यवस्थापन समिती ही त्यांच्या कुटुंबासाठी चांगले सहकार्य करते. हालाखाची परिस्थिती असल्याने परमिंदर कौर ने मुलीला याच ठिकाणी जन्म दिला आणि तिचं नाव खुषी ठेवलं परमिंदर कौरच्या धाडसाचं धेर्याच कौतुक केलं तेवढं कमीच म्हणावं लागेल. परमिंदर कौर याच्या सेवाभाव कार्यास सलाम.

हे देखील वाचा :

डीआरडीओमध्ये ७९ पदांवर संधी

सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर्स, असोसिएट्सच्या ४४ जागा

lead storyParmeendar Kour