वाहणाऱ्या वृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ करण्यात मग्न; शेवटी नाल्यात वाहून दुर्दैवी मृत्यू

नांदेड जिल्ह्यातल्या खतगाव येथे एक ६५ वर्षीय वृद्ध नाल्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नांदेड : जिल्ह्यात मागील दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाले दुधडी भरून वाहात आहे. मुखेड तालुक्यातील मुसळधार पाऊस झाल्याने खतगाव येथे एक ६५ वर्षीय वृद्ध नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी घडली.

मुखेड तालुक्यातील खतगाव येथील विठ्ठल धोंडीबा माने हे शेतात शेळ्या चारून घरी परतत असताना मोठा पाऊस झाल्याने गावाच्या पुर्व बाजुला असलेल्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत होते.

पाण्याचा अंदाज लक्षात न आल्याने विठ्ठल माने हे प्रवाहात वाहुन गेले. पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना घटनास्थळी नागरिक मात्र मदत करण्याऐवजी व्हिडीओ काढण्यात मग्न होते. वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह तळ्याच्या कडेला आढळून आला.

घटनास्थळी महसुल विभागाचे कर्मचारी जाऊन पंचनामा करून तहसिल कार्यालयाला अहवाल पाठविला आहे. दरम्यान दोन दिवसांपासून मुखेड परिसरात पावसाने झोडपून काढले आहे.

वृद्ध वाहून जात असतांना मात्र तेथील कोकांनी त्या वृद्धाला वाचवण्याचा प्रयत्न न करता व्हिडीओ करण्यात धन्यता समजल्याने मात्र माणसात माणुसकी संपत चालली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे देखील वाचा  :

आर्टलाईनने ‘जिवंत’ ठेवली कलाकारांची हार्टलाईन

सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल करुन संपवली जीवन यात्रा

मृताच्या नातेवाईकांनी केली इंटर्न डॉक्टरला मारहाण!, तीन लोक पोलिसांच्या ताब्यात