आदर्शगांव योजनेसाठी कृषी विभागाने अर्ज मागविले.

लोकस्पर्श न्यूज:

गडचिरोली 11 नोव्हें. :

आदर्शगांव योजना प्रामुख्याने लोकसहभागातून ग्रामविकास व लोकाभिमुख कार्यक्रमात शासनाचा सहभाग या संकल्पनेवर आधारलेली आहे. लोक कार्यक्रमात शासनाचा सहभाग या सुत्रानुसार गावाच्या सर्वागीण विकासा बरोबरच गावाची सामाजिक शिस्त सुधारून प्रत्येक तालुक्यातून एक पथदर्शक अशा स्वयंपुर्ण गावांचा ग्रामस्थांच्या सहकार्याने व स्वंयसेवी संस्थेच्या सहभागाने गावांचा सर्वांगीण व निरंतरविकास हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. आदर्शगांव योजना ही इतर योजना पेक्षा अत्यंत वेगळी योजनाआहे. यामध्ये योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रत्येक गावाने मृद व जलसंधारणाच्या (गाभा क्षेत्रातील उपचार) तसेच गावविकासाठी कामे (बिगर गाभा क्षेत्रातील कामे) आदर्शगांव योजनेतून व शासकिय विभागाच्या सहकार्याने करणेअपेक्षितआहे.या योजनेत समाविष्ठ होण्यासाठी गावाने स्वयंस्फुतीने पुढे आले पाहीजे असे अभिप्रेत आहे. सामाजिक शिस्तीच्या संदर्भात गावाने सप्तसुत्रीचे पालन करणे बंधनकारकआहे.

          आदर्शगांव योजनेत नव्याने निवड करणेत येणाऱ्या एकूण 25 टक्के गावांचे प्रस्ताव जलसंधारणातील विविध विभामामार्फत घेता येतील व 75 टक्के गावे ही स्वयंसेवी संस्थेमार्फत घेता येतील. यामुळे स्पर्धा निर्माण होईल व चांगल्या कामांची फलनिष्पती होईल. गावाची निवड करणे तसेच गाव योजनेतून वगळणे याबाबतचे अधिकार ग्रामसभेस दिलेलेआहेत.

       आदर्शगावे ही प्रातिनिधीक व्हावीत, विविध कृषि हवामान विभागासाठी तसेच जिल्हयाच्या भौगोलीक परिस्थितीनुसार वेगवेगळे माडेल राज्यात उभे राहावे यासाठी प्रत्येक जिल्हयाला आदर्शगांव निर्मितीचे लंक्षाक सुध्दा असणे महत्वाचेआहे. यामध्ये 1994 ते 2009 आणि 2009 ते 2014 पर्यंत काही लक्ष्य ठेवण्यात आले होते. संदर्भाधीन 2015 च्या शासन निर्णयानुसार नविन मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातील सर्व जिल्हयांना प्रतिनिधीत्व देत असतांना प्रत्येक जिल्हयामधुन कमीत कमी 5गावे या प्रमाणे प्राधान्य देण्यात यावे तसेच प्रत्येक पंचवार्षिक कालावधीत 100 नविन गावे निवडीचे लंक्षाक पुर्ततेसाठी प्रयत्न करावेत. सद्यस्थितीत राज्यातील 29 जिल्हयातून 85 तालुक्यामधून 107 गावे आदर्शगांव योजनेत सक्रीय आहेत. यातील बरीचशी गावे बहिर्गमन टप्यात आहेत. तरी गडचिरोली जिल्हयातील स्वयंस्फुतीने पुढे येणारी गावे व चांगल्या काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थायांना आदर्शगांव योजनेत समाविष्ठ होण्यासाठी या कार्यालयाकडे अर्ज करण्यात यावा.असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,गडचिरोली यांनी कळविले आहे.