महाराष्ट्र थोडक्यात बचावला – अमेरिकन लेखक टीम कल्पान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 16 सप्टेंबर :-  सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक टीम कल्पान यांनी वेदांता-फॉक्सकॉन या प्रकल्पाबद्दल नुकतेच एक भाष्य केले आहे. त्यांनी या प्रकल्पाची तुलना विस्काँसिन- फॉक्सकॉन कराराशी केली आहे. विस्काँसिन- फॉक्सकॉन मध्ये असाच व्यावसायिक करार झाला होता. आणि त्यामुळे अमेरिकेचे नुकसान झाले होते. तसे भारताचे नुकसान होऊ नये याकरिता त्यांनी भारताला फॉक्सकॉन बद्दल करार करताना कशी फसवत होईल यासाठी सावधानतेचा इशारा दिला आहे.

कल्पान असे म्हणतात की, “जेव्हा वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी “१९.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असे म्हटले , तेव्हा ते वचन नसते तर ते इच्छा असते. तसेच याही प्रकल्पात फॉक्सकॉन आहे. फॉक्सकॉनचे या प्रकल्पातील सहभाग सल्लागार स्वरूपाचा आहे आणि खर्चाचा बराचसा भार वेदांता ग्रुपवर आहे.”

फॉक्सकॉनने अमेरिकेत १०जी लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले पॅनल बनवण्याची घोषणा केली होती, ते प्रत्यक्षात झालीच नाही. नशिब त्यांनी आयफोन बनवण्याची घोषणा केली नव्हती, असे हे लेखक म्हणतात.

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही क्रांतिकारक प्रयत्न करण्यापेक्षा राजकीय नेते स्वतःच्या प्रसिध्दीसाठी असे प्रकल्प जाहीर करतात, ज्यांचा कधी सर्वसामान्यांनी विचार केलेला नसतो. अमेरिकेतील लोकांनाही असे स्वप्न दाखवण्यात आले, आता भारताची वेळ आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

त्यावेळी अमेरिकेत नेमके काय घडले ?

२०१७ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी बराच गाजावाजा करून फॉक्सकॉन- विस्कॉन्सिनमध्ये १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आणि त्यातून १३ हजार लोकांना रोजगार मिळणार अशी घोषणा केली होती. पण या प्रकल्पाने त्याचं उद्दिष्ट कधीच पूर्ण केले नाही, असे कल्पान यांनी म्हटलेले आहे. फॉक्सकॉन १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार हे न पटणारे होते. या समूहाचे अध्यक्ष टेरी गॉ यांनी नंतर खुलासा करताना म्हटले होते, “असं नियोजन आहे, आणि तशी आमची इच्छा आहे. पण तसं आम्ही वचन दिलेले नाही.”

सध्या महाराष्ट्रात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून मोठा वाद सुरू आहे. महाराष्ट्रात होणारा हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रात सत्ताधारी शिंदे – भाजप गट आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर ब्लुमबर्गसाठी तंत्रज्ञान विषयावर लिहिणारे लेखक टिम कल्पान यांनी एक लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी फॉक्सकॉनच्या अमेरिकेतील अपयशी प्रकल्पाचा हवाला देत गुजरातमध्येही तिच गत होणार आहे, असे म्हटले आहे. या लेखात त्यांनी महाराष्ट्राचे नुकसान झालेले नसून महाराष्ट्र थोडक्यात बचावला आहे, असा टोलाही लगावला आहे.
हे देखील वाचा :-