Sensex सर्वोच्च स्तरावर 500 हून अधिक अंकांनी वाढ.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क ९ नोव्ह :-सोमवारी शेअर बाजार आतापर्यंतच्या उच्चांकाच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच अखेर सेंसेक्सनं उच्चांक गाठला.अमेरिकन निवडणूकीचा निकाल निश्चित झाल्यानं आशियातील बाजारात दमदार खरेदीचा माहोल दिसून आला.
सोमवारी निफ्टीचा उच्चांक १२४२४ वर पोहोचला. शुक्रवारी संध्याकाळी निफ्टी १२२६३वर असल्य़ाचं पाहाला मिळालं होतं. दरम्यान सेन्सेक्स आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचून निफ्टीचाही नवा उच्चांक पाहायला मिळाल्यामुळं दिवाळीआधीच शेअर बाजारात फटाके फुटले असल्याचं वातावरण आहे.