१ कोटी ६४ लाखांचा घोटाळा : एफडीसीएमचा तत्कालीन विभागीय व्यवस्थापक जाळ्यात

पुन्हा १० अधिकारी कर्मचारी रडारवर ....
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि. ९ जानेवारी : वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जुन्या सागवान आणि बांबूचे उत्पादन दाखवून कमी प्रमाणात विक्री केली. यामध्ये १ कोटी ६४ लाखांचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे.  या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तत्कालीन विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल नरहर वाघ याला तीन दिवसांपूर्वी नागपुरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.  वाघ याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणात पुन्हा १० अधिकारी आणि कर्मचारी रडारवर असल्याची माहिती आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांत वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर कार्यालयांतर्गत कन्हाळगाव वनपरिक्षेत्रात सागवान कटाई व बांबू निष्कासनाची कामे करण्यात आली. यामध्ये इमारती, हॉटेल, बिट, लांब बांबू, चपाटी बांबू व बंडल बांबू या वनउपजांचा समावेश होता. या कुपात उत्पादित वन उप्जांची भौतिक मात्र आणि बल्लारपूर व कन्हाळगाव विक्रीत आकारात वाहतूक झालेली मात्रा यात तफावत होती, तरीही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वन उपजाची मात्रा योग्य असल्याचे दाखविण्यासाठी प्रत्यक्ष उत्पादन नसतांनाही उत्पादनाची खोटी प्रमाणके तयार केली.

सोबतच एकाच मजुराच्या एकाच कालावधीसाठी वेगवेगळ्य प्रमाणात नवे दर्शवून खोट्या अभिलेखाद्वारे मजुरीची रोख रक्कमही उचल केली. या सर्व प्रकारात ४७ लाख ५५ हजार २५१ रुपये इमारती, फाटे व बिट रक्कम व बांबू उत्पादनाचे १ कोटी ६३ लाख ४० हजार ५१५ रुपये असा एकूण शासनाच्या १ कोटी ६३ लाख ९५ हजार ७६० रोख रकमेचा अपहार केल्याची तक्रार १७ ऑक्टोबर २०११ रोजी बल्लारपूर पोलिसांना प्राप्त झाली होती. याआधारे बल्लारपूर पोलीस ठाण्यात कलम ४०९, ४६६, ४७१,३४ अन्वये तत्कालीन विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. अपहाराचे प्रकरण दुसऱ्याच दिवशी पुढील कारवाईसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वळते करण्यात आले.

पुढील तपास पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विपिन इंगळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप मस्के करीत आहेत.

हे देखील वाचा : 

महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात…

आरोग्य कर्मचारी संपावर!…

राहूल गांधी आणि हिंदुत्वाच्या मांडणीतील गोंधळ – ज्ञानेश वाकुडकर

 

lead news