गोवंशाची तस्करी करणाऱ्या ट्रक मधून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

  • ३७ जिवंत गोवंशाची सुटका.
  • कुरखेडा पोलिसांची गोठणगाव टी पाईटं जवळ कारवाई.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १८ मार्च: गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दहा चाकी ट्रक गोठणगाव टी पाईटं कडून कुरखेडा कडे येत असताना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास कुरखेडा पोलिसांनी पकडून ट्रक मधील ३७ जनावरांची सुटका केली तर ट्रक जप्त करीत आरोपी ट्रक चालकाविरोधात विविध कलमान्वये गून्हा दाखल करीत अटक केली आहे.  

        आज सकाळी गस्तीवर असलेले गडचिरोली येथील मोटर वाहन निरीक्षक सचिन जामखंडीकर याना गोठणगाव टी पाईटं कडून कुरखेडा कडे एक दहा चाकी ट्रक क्र एम एच ३६ एफ ४७८६ संशयास्पद पणे येत असल्याचे दिसल्याने त्यानी ट्रक थांबवत चालकाला वाहनाबाबत विचारपूस केली यावेळी ट्रक मध्ये गोवंश भरून असल्याचे दिसून आल्याने त्यानी लगेच भ्रमनध्वनी वर कुरखेडा पोलीस स्टेशन ला माहीती दिली लगेच येथील ठानेदार सुधाकर देडे पोलीस उपनिरीक्षक नारायन शिंदे यानी वाहतूक हवालदार विलास शेडमाके  घटनास्थळी दाखल झाले ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये पांढऱ्या रंगाचे ९ गोरे लाल रंगाचे १८ गोरे तर काळ्या रंगाचे १० गोरे असे एकूण ३७ जिवंत व दोन मृत गोरे प्रत्येकी १० हजार कीमती प्रमाणे ३ लक्ष ९० हजार कीमतीचे गोवंश निर्दयीपणे कोंबून वाहतूक करीत असल्याचे आढळून आले यावेळी ७ लक्ष रूपये किमत असलेला ट्रक जप्त करीत आरोपी ट्रक चालक भूषण ओमकार तरारे वय ३१ रा कामठी (नागपुर)याला अटक करण्यात आली त्याचा विरोधात प्राण्यास निर्दयीपणे वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० व महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी सूधारणा अधिनियम २०१५ चा विविध कलमान्वये गून्हा दाखल करण्यात आला आहे तसेच जिवंत सर्व गोर्यांची रवानगी गोठणगाव येथील गोशालेत करण्यात आलेली आहे.

Robbery