लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : कोरची तालुक्यातील खिरूपटोला जंगल परिसरात गोवंश तस्करांनी ११६ नग जनावरे बांधून असल्याची माहिती कोरची पोलिसांना मिळताच गुन्ह्याची नोंद घेवून तस्करावर कारवाई केली.
कोरची तालुका हा छत्तीसगड सीमेला लागून असल्याने सदर परिसरात जंगले भरपूर प्रमाणात असल्याने गोवंश तस्कर हे जनावरे खरेदी करून जंगल परिसरात लपवून ठेवतात. कोरची तालुका हा जनावर तस्करांचाअड्डा बनला आहे. तालुक्यातील खिरुपटोला जंगल परिसरात कत्तलीसाठी नेणारी जनावरांना जंगल परिसरामध्ये चारा पाणी न देता आखुळ रस्सीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत असल्याची पोलिसांना मिळाली असता पोलीस खिरूपटोला जंगल परिसरात लपवून ठेवलेल्या ११६ कोंबून ठेवलेली जनावरे कत्तलीस नेण्यासाठी जंगलात बांधलेल्या होत्या. कोरची पोलिसांनी कारवाई करून जनावराची सुटका केली आहे. सदर गोवंश जनावरांची किंमत अंदाजे १३ लाख ५५ हजार रुपये असून चार गोवंश तस्करांवर कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले आहे.
मदन सहारे वय ३५ वर्ष, विलास गायकवाड वय ३२ वर्ष दोघेही रा. हेटाळकसा, ता. कोरची व रामदास सहारे रा. खिरुटोला व राजू कुरेशी नागपूर हा ठोक व्यापारी या चारही आरोपीविरोधात प्राण्यांच्या छळ प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) अन्वये तसेच पशुसंरक्षण अधिनियम १९७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील आरोपी रामदास सहारे याला अटक करण्यात आली आहे.
तर तीन आरोपींचा शोध पोलीस घेत असून या कारवाईमुळे तालुक्यातील जनावर तस्करांचे धाबे दणाणले आहेत. सदरची कारवाई कुरखेडाचे एसडीपीओ रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी केली आहे. तर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे करीत आहेत
हे ही वाचा,
चिचडोह बॅरेजचा पाणीसाठा सिंचनासाठी मिळण्याचे नियोजन करा – संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क-NEP 2020 वर एक दिवसीय कार्यशाळा