विनापरवाना फार्मसीमधून २ लाख ६५ हजाराचा औषध साठा जप्त, अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई

वर्ध्यातील आंजी मोठी येथील प्रकार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा : विनापरवानगी सुरू असलेल्या औषध दुकानावर अन्न व औषध विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. वर्ध्यातील आंजी मोठी येथे झालेल्या या कारवाईत तब्बल पावणेतीन लाखाचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. आधी साईकृपा या नावाने सुरू असलेल्या फार्मसीला परवाना रद्द झाल्यावरही विना परवानगी सतत आठ महिने चालविण्याचे धाडस केले गेले आहे. त्यामुळे औषध साठा जप्त करून कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वर्धा तालुक्यातील आंजी मोठी येथे साईकृपा मेडिकल स्टोअर ही फार्मसी रद्द झाली होती.  परंतु अन्न व औषध प्रशासनाने या फार्मसीवर सतत वॉच ठेवला. या ठिकाणावरून औषधें विकली जात असल्याचे त्यांच्या रेकीमधून लक्षात आले.

चौकशीअंती मोठ्या प्रमाणात स्टॉक दिसून आला आहे. १५ बॉटल सायरब, हायर अँटिबायोटिक, स्टिरॉइड सारखी औषधें सापडली. तब्बल २ लाख ६५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. कोणत्या स्टोकिस्टने हा औषध साठा फार्मसीला दिला याची देखील चौकशी केली जाणार आहे.

हे देखील वाचा :

सोमवारपासून पुणेकरांना आणखी दिलासा, नियम शिथिल होणार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका.. खडे बोल सुनावत मागणी फेटाळली..

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याच्या दुकानावर संतप्त नागरिकांनी केली दगडफेक

 

lead storywardha pharmacy