लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नवी मुंबई : गुंतवणूक करून व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असे आमिष दाखवून एका व्यक्तीने मुंबई आणि उपनगरातील तीन लाख लोकांना ५०० कोटी रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
मीराभाईंदर येथील फसवणुकीची घटना ताजी असतानाच एका व्यक्तीने मुंबई आणि उपनगरातील तीन लाख लोकांना गुंतवणूक करा व व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आमिष दाखवून ५०० कोटी रुपयांचा चुना लावला आहे. सदर व्यक्तिने लोकांना पाच वर्षात दुप्पट, सात वर्षात तीनपट आणि १० वर्षांमध्ये चौपट रक्कम देण्याचे आमिष दाखवले होते. त्याच्या या आमिषाला बळी पडत तीन लाख लोकांनी त्याच्याकडे पैसे जमा केले होते.
पोलिसांना या चिटफंड घोटाळ्याची माहिती मिळेपर्यंत त्याने तीन लाख लोकांना अंदाजे ५०० कोटी रुपयांना लुबाडले होते. हा चिटफंड घोटाळा माफको मार्केट च्या समोरील ्टोरेस लिमिटेडने केलेल्या हेराफेरीचा आहे. या कंपनीचे बऱ्याच ठिकाणी ब्रॅंचेस असून इन्व्हेस्टमेंट केलेल्या नागरिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून सदर कंपनीमध्ये पोलीसकडून पंचनामा सुरु आहे.
हे ही वाचा,