चोरीचे 56 एन्डराईड मोबाईल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची धडाकेबाज कारवाई
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड, 04 नोव्हेंबर :- नांदेड जिल्हयात सार्वजनीक ठिकाणाहुन व बाजारातुन महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता  पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांना चौकशी करण्यास सांगितले होते. पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यानी स्था. गु.शा. येथील पोलीस अमंलदाराचे एक पथक तयार करुन मिसींग मधील मोबाईलचा शोध घेणे सुरू केले होते.

स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पथकाने नांदेड शहरातील व जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळया ठिकाणी जावून नांदेड जिल्हातील एकुण ५६ मोबाईल किमती ७,७६,०६४/- रुपयाचे मोबाईल हस्तगत केले आहेत. संबंधीतानी पोलीस स्थानकात येवून यादीतील मोबाईलचे IMEI नंबरची खात्री करुन ज्यांचे मोबाईल आहेत त्यांनी घेवून जाण्याचे आवाहन पोलीस प्रशासना कडून करण्यात आले आहेत .

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्था. गु. शा. नांदेड, पोउपनि. दत्तात्रय काळे, गोविंद मुंडे, गंगाप्रसाद दळवी, पोलीस अंमलदार संजय केंद्रे, गंगाधर कदम, सुरेश घुगे, दशरथ जांभळीकर, सखाराम नवघरे, गणेश’ धुमाळ, विलास कदम, विठल शेळके, बालाजी यादगीरवाड, पदमसिंह कांबळे, बालाजी तेलंग, गजानन बयनवाड, महेश बडगु  व सायबर सेलचे पोह/ राजु सिटीकर, दिपक ओढणे यांनी पार पाडली असून सदर पथकाचे  पोलीस अधीक्षक साहेब यांनी कौतूक केले आहे.

हे पण वाचा :-

56 stolenandroidmobilesseized