लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला 22 दिवसाचा कालावधी उलटूनही आरोपीस अजूनही अटक झालेली नाही.त्याकरिता मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तपासाबाबत चौकशी करण्याकरिता बीड पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्याकांडाच्या मागे वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या चार लोकांवर आरोप असून फरार आरोपींला पकडण्यासाठी सीआयडीची नऊ पथके आणि १५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले असून संपूर्ण देशभर त्यांचा शोध सुरू आहे. परंतु २२ दिवस उलटूनही आरोपी अजून पर्यंत सापडलेले नाहीत.
दोन कोटी रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी वाल्मीक कराड आरोपी आहे. पुण्यात रविवारी रात्री तो पोलिसांना शरण आल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु पुण्यात त्यांचेवर गुन्हा दाखल नसल्यने त्याला अटक करण्यात आली नाही.
हे ही वाचा,
जिल्हयातील २ हजार २२७ युवा बेरोजगारांना ‘मुख्यमंत्री दूत’ म्हणुन संधी !