लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याने केली आत्महत्या;

आर्थिक परिस्थितीला कंटाळलेल्या दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर :  आर्थिक परिस्थितीस  कंटाळून एका  दाम्पत्याने स्वतःच्या अंत्यविधीची व्यवस्था करून लग्नाच्या वाढदिवशीच नागपूरच्या मार्टीननगरातील जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप वय ५४ वर्ष आणि पत्नी अॅनी जारील मॉनक्रिप वय ४५ वर्ष या दाम्पत्याने  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . सदर घटनेने नागपुर शहरात खळबळ उडालेली आहे.

सदर घटना ही जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टीननगरात घडली आहे. विशेष म्हणजे  या जोडप्याने  स्वताच्या अंत्यविधीसाठी घरात 75 हजार रुपये सुद्धा ठेवले असल्याचे  चिठ्ठीत नमूद करत माफी मागितली आहे. महिलने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप स्टेट्सवर ठेवला. तसेच एक नोट देखील लिहून ठेवली होती. तसेच  या जोडप्याने लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे कपडे परिधान केले होते.

गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसत आहे. तसेच नैराश्येमुळेही अनेक जन  जीवन संपवत आहे. नाशिकमध्ये मुलाच्या लग्नाला अवघे 20 दिवस शिल्लक असताना पती-पत्नीने विष घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच, नागपूरमध्येही हृदय पिळटवून टाकणारी घटना समोर आली.

हे ही वाचा,

वनविभागाने दोन वर्षांची मजुरी थकवली,असतानाही (म.ग्रा.रो.ह.यो) अंतर्गत नवीन कामांचा आग्रह !

*ग्रामसभा मेहाखुर्द येथे सामूहिक वनहक्क क्षेत्रात नरेगा अंतर्गत ५००० रोपांची वृक्षलागवड*

अंगणवाडी कर्मचारी युनियनची (सिटु) बैठक एटापल्लीतील मंगेर येथे संपन्न

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आणि विद्युत्त क्षेत्रातील कर्मचारी यांनी प्रीपेड स्मार्ट मीटरचे विरोधात केले आंदोलन !