प्राईम लोकेशन वरील प्लॉट दाखवून प्लॉट खरेदीदारांना लुटणारी आली टोळी

सौदा करताना सावधान : प्लॉट इसारच्या नावावर उकळतात लाखो रुपये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : शहरातील प्राईम लोकेशन वरील  कुणाचाही प्लॉट दाखवून त्याचा अगदी स्वस्तात सौदा करून टोकन म्हणून दोन ते तीन लाख रूपये उकळणारी टोळी गडचिरोली शहरात सक्रीय झाली आहे. तरी या टोळीपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे

काही नागरिकांनी केवळ गुंतवणूक म्हणून प्लॉट खरेदी करून ठेवले आहेत. आता या प्लॉटच्या चारही बाजूला वस्ती झालेली आहे. त्यामुळे एखादाच प्लॉट शिल्लक आहे तसेच बरेचसे प्लॉट मालक गडचिरोली शहरात राहत नाही. त्यामुळे  एजंटने जरी प्लॉट दाखवला तरी कोणाचाही आक्षेप राहत नाही.याचा गैरफायदा काही लोकांनी घेण्यास सुरुवात केली आहे. एखादा प्लॉट दाखवून तो विकायचा आहे, असे सांगीतले जाते. एखाद्याला बनावट प्लॉटमालक बनवून सौदा केला जातो. काही नागरिकांची अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे.

गडचिरोली शहराची लोकसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. शहराच्या एका बाजूला कठाणी नदी, दोन्ही बाजूला जंगल असल्याने विस्तारासाठी फारशी जागा शिल्लक नाही. त्यामुळे खरेदीदारांच्या तुलनेत प्लॉटची संख्या कमी असल्याने एखाद्या जागेवर चुना टाकून आखणी झाल्याच्या काही दिवसातच प्लॉट विकले जातात. शहराच्या मध्यभागी असलेली जागा व्यावसायिक कामासाठी खरेदी केली जाते.  काही जाणांनी अनेक वर्षांपूर्वी गुंतवणूक म्हणून सदर प्लॉट खरेदी केले आहेत. काही प्लॉटधारक दुसऱ्या शहरात राहतात.  तरी अनोळखीं व्यक्तीशी  व्यवहार करताना काळजी घेणे आव्क्श्यक आहे.