लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वर्धा, दि. २३ जानेवारी : आर्वी येथील अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या डॉ. कदम यांच्या घरात पोलिसांना चक्क ९७ लाख ४२ हजार ७७२ रुपये आढळल्याने खळबल माजली. दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी पोलिसांना ही रक्कम दिसली असून रात्री उशिरापर्यंत ही रक्कम मोजणे सुरु होते. एवढी रक्कम आढळून आल्याने आर्वी पोलिसांनी आयकर विभागाला माहिती दिली आहे.
गर्भपात प्रकरणाच्या तपासदरम्यान पोलिसांनी कदम यांच्या घरातील सील केलेल्या खोलीला उघडून तपासणी केली असता एका कपाटात जुन्या लोखंडी पेटीत बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम आढळून आली. ही रक्कम तब्बल ९७ लाख ४३ हजार ७७२ रुपये असल्याचे समोर आले आहे.
प्रकरणाचा तपास करत असतांना पोलिसांनी कदम याचे रुग्णालयाच्या वर असलेल्या घरात आधी तपासणी केली होती. मात्र त्यावेळेस डॉक्टर नीरज कदम यांच्या आई डॉ. शैलजा कदम यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने शैलजा कदम यांना नागपूर येथे रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. शैलजा यांच्यासोबत नीरज कदम यांचे वडील कुमारसिंग कदम हे सुद्धा रुग्णालयात असल्याने एका खोलीला लॉक असून त्याच्या चाव्या या कुमारसिंग कडे असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे पोलिसानी ती खोली सील केली होती.
काल रात्री उशिरा शनिवारी कदम कुटुंबियाकडून त्या खोलीची चावी पोलिसांना सुपूर्द केली असता पोलिसांनी खोली उघडून त्यात काही कागदपत्रं किंवा महत्वाचे पुरावे मिळतात काय, याची तपासणी केली असता खोलीत पाच ते सहा कपाटं दिसून आले. पोलिस कपाटं उघडून तपासणी करत असतांना त्यात पोलिसांना एक लोखंडी पेटी आढळली त्यात जवळपास तीन बॅग मध्ये पोलिसांना रक्कम आढळली. रात्री उशिरापर्यंत मशिनच्या मदतीने पोलिसांनी रक्कम मोजली असून यात ९७ लाख ४२ हजार ७७२ रुपये आढळले.एवढी मोठी रक्कम आढळून आल्याने पोलिसांनी आयकर विभागाला माहिती दिली आहे.
हे देखील वाचा :
जवान अन किसान देशाचे आधारस्तंभ, त्यांचा आदर करणे आपली सामाजिक जबाबदारी – मंत्री छगन भुजबळ
झुडपी जंगलाबाबत केंद्र शासनास तातडीने प्रस्ताव सादर करा- पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार