कुरखेड्यातील संस्कार बँक गैरव्यवहारातील आरोपी मोकळेच,..

ठेवीदारानी केली .सखोल चौकशीची केली मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

 गडचिरोली : दि. २५ डिसेंबर, संस्कार  क्रेडिट को-ऑप. बँक, कुरखेडi येथे  झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरनातील आरोपी अद्यापही मोकळेच असून आरोपींना अटक करण्याची मागणी आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव छगन शेडमाके, ठेविदार व नागरिकाकडून होत आहे.

संस्कार क्रेडिट को-ऑप. सोसायटीचा अध्यक्ष मनीष फाये, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज बांगरे, संस्था उपाध्यक्ष व भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, संचालक दीनदयाल . भट्टड, नितीन कावळे, मंगेश मांडवे, हरीश टेलका, लक्ष्मण धुळसे, परसराम नाट, चेतना कुंभलवार, मंगला वडीकर, व्यवस्थापक दिवाकर देवांगण, कर्ज अधिकारी प्रल्हाद लांजे यांनी वेदप्रकाश विजयसिंग राठोड वय ३८ वर्ष  रा. गांधी वॉर्ड  कुरखेडा व  शुभम राजकुमार परिहार तत्कालीन व्यवस्थापक कोरची शाखा यांच्या खात्यातून परस्पर २१ लाख ५० हजार रुपये कर्ज उचलले, प्रभा रामकुमार परिहार यांच्या नावे २० लाख  ९९ हजार ९०० रुपये तसेच मुनेश्वर पारधी, लोमेश पारधी या खातेदारांच्या नावेही परस्पर कर्ज उचलले आहे.

सदर गुन्हाबाबत माहिती होताच संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक तसेच अधिकारी अशा एकूण १४ जणांवर दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हयाची  नोंद करण्यात आली  असून आरोपीना अद्यापही अटक करण्यात आलेली नसल्याने आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव छगन शेडमाके यांनी दि. २४ डिसेंबर रोजी  विभागीय आयुक्तांकडे तक्रार दिली असून पोलिसाकडून आरोपींना अद्यापही अटक का करण्यात आलेली नाही ? सदर गुन्ह्यात मोठे मासे असण्याची शक्यता असल्याने  या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होत आहे. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदना द्वारे केलेली आहे.

हे देखील वाचा,

अवैध दारू विक्रीविरोधात महिला संतप्त; अनेक बॉटल फोडत दारू विक्रेत्याची जाळली झोपडी

 

२४ डिसेंबर रोजी  विभागीय आयुक्तांकडे तक्रार दिलीकुरखेडiमुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोलीसंस्कार  क्रेडिट को-ऑप. बँकसंस्कार क्रेडिट को-ऑप. सोसायटीचा अध्यक्ष मनीष फाये