अहेरी पोलिसांच्या धडक कारवाईत महागाव येथे चारचाकी वाहनासह ५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त, तिघा जणांना केली अटक 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : अहेरी उपविभागीय पोलीस पथकाने महागाव येथे आज शनिवारी सापळा रचुन चारचाकी वाहनास ५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करत तिघा जणांना अटक केल्याची कारवाई करण्यात आली.

गुलाब विठ्ठल देवगडे (३०), ज्ञानेश्वर राजलीगु दुर्गे (२१), सोहनलाल बालय्या चाफले (४०) सर्व रा. छल्लेवाडा जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गडचिरोली जिल्यात दारूबंदी असतांनासुध्दा छत्तीसगड राज्यातुन चोरट्या मार्गाने अहेरी तालुक्यात काही दारू विक्रेते अवैध दारू वाहतुक करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती उपविभाग पोलीस अधिकारी अहेरी यांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने सापळा रचुन अवैधरित्या विदेशी दारू वाहतुक करणाऱ्या ३ इसमांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

सापळा कारवाई दरम्यान दारूची वाहतुक करण्यास वापरण्यात आलेली टाटा ग्रेन्डी टीएस १२ युए ४५२८ क्रमांकाच्या  चारचाकी वाहनासह एकुण ५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, समिर शेख, सोमय मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्यासह पथकातील नापोशी नितीन पाल, नापोशी श्रीकांत भंडे, पोशि वडजु दहिफले, पोशि सुरज करपेत यांनी केली.

 

हे देखील वाचा :

आलापल्ली ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सचिवाला माहिती न दिल्याप्रकरणी २५ हजारांचा दंड तर विस्तार अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे राज्य माहिती आयोगाचे आदेश

 

ओबीसींना न्याय मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

भाजपा तर्फे अहेरी येथे ओबीसी राजकीय आरक्षणासाठी चक्काजाम व जेलभरो आंदोलन

 

Aheri Policelead story