ग्रामपंचायत समितीने केली दारू नष्ट; कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
गडचिरोली, दि. २६ मार्च : चामोर्शी तालुक्यातील वेलतूर तुकुम येथील दोन दारु विक्रेत्यांच्या घराची ग्रामपंचायत समितीने तपासणी केली. यावेळी मिळून आलेला ७० निपा देशी दारू नष्ट करीत पुन्हा विक्री न करण्याचे ठणकावून सांगितले.
वेलतुर तुकुम ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत मुक्तीपथ ग्रामपंचायत समिती गठीत करण्यात आली व गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री बंद करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले.
गावात दोन विक्रेते अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्रीचा व्यवसाय करित असून अवैध दारूविक्री  बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानुसार समितीच्या पदाधीकार्यानी दोन्ही अवैध दारूविक्रेत्याच्या घराची तपासणी केली. यावेळी एका घरी ७० देशी दारूच्या निपा मिळून आल्या. संपूर्ण माल नष्ट करून पुन्हा अवैध दारूविक्री न करण्याचे ठणकावून सांगितले. तसेच अवैध दारूविक्री करतांना आढळल्यास पोलिसांच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी सरपंचा संध्या नायगावकर, तंमुस अध्यक्ष अशोक कुळसंगे, समिती अध्यक्ष सचिन आत्राम, तालुका संघटक आनंद इंगळे, यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

हे देखील वाचा : 

महिला स्वतः सक्षम होऊन दुसऱ्यांना सक्षम करतात – डॉ. संपदा नासरी

धक्कादायक! तरुणाची निर्घृण हत्या!

 

 

daru nashtlead news