अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याच्या दुकानावर संतप्त नागरिकांनी केली दगडफेक

 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली : मिरज शहरातील बोकड चौक परिसरात आज दगडफेक करण्यात आली. अश्लिल व्हीडीओ दाखवून मिरजेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या फैय्याज कोकणे या आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने आरोपीच्या दुकानावर दगडफेक केली.

तुफान दगडफेक करून आरोपीच्या पानशॉपची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीनंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.

आरोपी फैय्याज कोकणे याला काल अटक करण्यात असून मिरज शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका.. खडे बोल सुनावत मागणी फेटाळली..

धक्कादायक! लग्नासाठी गेलेल्या जावयाच्या अंगावर ओतले पेट्रोल अन् दिले जाळून

 

crimelead storysangli police