कोल्हापूरात भाचीनं मर्जीविरुद्ध लग्न केलं म्हणून, मामानं भाचीच्या लग्नाच्या जेवणात मिसळलं विष.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

कोल्हापूर :  पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावातील भाचीनं मामाच्या परवानगी शिवाय पळून जाऊन लग्न केल्याबद्दल, मामाने मुलीच्या लग्नाच्या जेवणात विष मिसळण्याची घटना घडली आहे. जेवणात विष मिसळताना त्यांची आचाऱ्यासोबत झटापट झाली, घाबरून मामाने त्या ठिकाणावरून पळ काढला. आणि झटापटीमुळे एक मोठी दुर्घटना टळली.

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात उत्रे गावात काल दुपारी ही घटना घडली. महेश ज्योतीराम असं या मामाचं नाव आहे. लहानपणापासूनच भाजी आपल्या मामासोबत राहत होती. गावातल्या एका मुलावर तीला प्रेम झालं. मात्र मामाचा या नात्याला नकार होता. मुलाकडचे लोक लग्नासाठी तीच्या घरीदेखील आले होते. मात्र मामाने लग्नासाठी नकार दिला. त्यावर मुलीनं पळून जाऊन आठवड्यापूर्वीच लग्न केलं. त्यानंतर गावातून वरातही काढण्यात आली. मुलीनं आपल्या मर्जीशिवाय लग्न केलं, हा अपमान लक्षात घेऊनच काल आयोजित समारंभात मामानं हा कट रचला. महेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तसंच विषयुक्त जेवणंही तपासासाठी पाठवण्यात आलं आहे.

हे ही वाचा,

 

महाराष्ट्रातील अभयारण्यामध्ये मोबाईल वापरास बंदी

अहेरीतील नगराध्यक्षांसह सात नगरसेवकावर झालेल्या अपात्रतेस स्थगिती

 

पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावातील भाचीनं मामाच्या परवानगी शिवाय पळून जाऊन लग्न केल्याबद्दलमामाने मुलीच्या लग्नाच्या जेवणात विष मिसळण्याची घटना घडली