सहाय्यक आरटीओ यास चारशे रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर :  प्रादेशिक परिवहन विभागातील कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय कर्मचारी कोणातेही काम करत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असतांना ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्फाक मेहमूद अहमद वय 57 वर्ष  यास 400 रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

पैसे दिल्याशिवाय किंवा दलालाची मदत घेतल्याशिवाय आपले काम होत  नाही, याची प्रादेशिक परिवहन विभागात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकाला चांगली माहिती आहे. त्यामध्ये  ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिक बदनाम आहे. येथे सामान्य नागरिकांची कामे न होता, दलालांची कामे तत्काळ केली जातात. मात्र काही दिवसांपासून येथील अधिकारी आणि दलालांमध्ये मतभेद सुरू होते. . ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक आपला शिक्का लावून अधिकाऱ्यांकडे कागदपत्र पाठवत होते त्यांचे काम  तत्काळ होत होते. परंतु इतरांचे काम होत नसल्याने नागरिकात नाराजीची भावना पसरली होती.

अश्फाक मेहमूद अहमद हे ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत.तर मिर्झा हा तेथे दलालीचे काम करतो. भालदारपुरा परिसरात राहणारे फिर्यादी एक ऑटोडीलर आहेत. त्यांनी त्यांच्या बहिण व ओळखीतील इतर दोघांच्या  वाहनांचे हस्तांतरण मालकी बदलण्यासाठी  प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज केला होता. अश्फाकने त्यांचे काम कोणतीही त्रुटी न काढता झटपट करून देण्यासाठी  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने 400 रुपयांची लाच मागितली होती. परंतु फिर्यादी यास लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने ऑटोडीलरने एसीबीकडे याची तक्रार केली. ठरल्याप्रमाणे सोमवारी तक्रारकर्त्याने अश्फाकची भेट घेतली असता त्याने दलाल मिर्झा असरागच्या माध्यमातून 400 रुपये घेतले. दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने असरागला अटक केली.  त्यानंतर अश्फाकलाही पकडण्यात आले. त्याच्यांकडून लाच  घेतलेली 400 रुपयाची रक्कमही जप्त केली असून  दोन्ही आरोपींविरुद्ध कपिलनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. .

हे ही वाचा,

भारत वनक्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकावर

नक्षल्यानी पोलिसांच्या वाहनाला स्फोटकाच्या हल्ल्यात उडविले 9 पोलीस जवान जागीच शहीद ; तर सात गंभीर

 

मोठी बातमी! दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर

 

नागपूर येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्फाक मेहमूद अहमद वय 57 वर्ष  यास 400 रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.