लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. २७ जुलै : अमरावती शहरात दोन स्कॉर्पियो मधून सुमारे ३ कोटी ५० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हि रक्कम हवालामार्फत वाहतूक करून नेण्यात येत होती. अशी माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरतीसिंग यांनी दिली आहे.
हवालामार्फत शहरातून मोठ्या रकमेची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील फरशी स्टॉप परिसरात नाकाबंदी केली होती. यावेळी दोन स्कॉर्पिओ गाड्यांमधून ही सुमारे ३ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
स्कॉर्पिओ मधून या मोठ्या रकमेची वाहतूक करणारे चार नागरिक हे गुजरातचे असून दोघे अमरावती मधील आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या स्कॉर्पिओमध्ये पैसे ठेवण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची जागा तयार करण्यात आल्याची माहिती अमरावती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.
ही रक्कम मोजण्यासाठी दोन मशीन जप्त करण्यात आल्या आहे. यासंदर्भात ट्रेझरी व इन्कम टॅक्स विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
हे देखील वाचा :
धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या तांदळात प्लॅस्टिकयुक्त तांदूळाचे मिश्रण
अंत्ययात्रा काढून ‘या’ प्राणीप्रेमी शेतकऱ्याने कोंबड्याला दिला अखेरचा निरोप…
ग्रामपंचायत आलापल्लीच्या ग्राम सदस्याचा सरपंचासह प्रशासनाच्या विरोधात एल्गार!