दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या तीन संशयीत इसमांना अग्निशस्त्रानिशी चामोर्शी पोलीसांनी घेतले ताब्यात

नागरिक व पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 31 मे- चामोर्शी शहरातील हत्तीगेटच्या बाजूला असलेल्या डिज्नीलँड इंग्लीश मिडीयम स्कूलजवळ काही संशयीत चोर  30 मे रोजी रात्री १० च्या दरम्यान फिरतांना दिसून आल्याने तीन इसमांना गावातील नागरीकांनी पकडून ठेवले असता. त्यांचे काही साथीदार चारचाकी वाहन घेवून पळून गेले आहे. अशी माहिती चामोर्शी प्रभारी अधिकारी विश्वास पुल्लरवार यांना फोनद्वारे मिळाली.

संशयीत चोरांची पोलीसांनी पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, सरताज खान इजहार खान याचेकडे 14.3 सेमी बॅरेलची लांबी, लाकडी पिस्टल ग्रिप असलेले एक देशीकट्टा (अग्निशस्त्र) अंदाजे किंमत 5000/- व त्यासोबत एक जिवंत 8 एमएम काडतूस मिळून आले. अमन अक्रम खान याचेकडे एक निमूळते टोक असलेले धारदार चाकू व त्यासोबतच रेडमी कंपनिचा मोबाईल अंदाजे किंमत 10,000/- रु. असलेला मिळून आले. यासोबतच गुलाम अहमद रजब अली याचेकडे लाल रंगाचे मिरची पावडरची पुडी मिळून आली.  मिळून आलेले एक देशी कट्टा (गावठी बंदूक) व जिवंत काडतूस तसेच धारदार शस्त्र (चाकू) असा एकुण 15815/- (अक्षरी पंधरा हजार आठशे पंधरा रु.) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

1) सरताज खान इजहार खान, वय 35 वर्षे रा. रामाळा तलाव, बगल खिडकी, चंद्रपूर तह. व जि. चंद्रपूर, 2) अमन अक्रम खान, वय 22 वर्षे, रा. रामटेकेवाडी ताडबन वार्ड नं. 02 शाई चौक चंद्रपूर                 3) गुलाम अहमद रजब अली वय 32 वर्षे, धंदा-मजूरी, रा. वार्ड नं. 02 राजूर ईजारा पोस्टे राजुर कॉलरी वणी जि. यवतमाळ असे  चोरंची नावे आहे. ज्वेलरी दुकानदार यांचेवर रेकी करत गावात फिरत होते व अन्य दोन साथीदार कारमध्ये बसून होते. तिघही संशयीत इसम गावात फिरत असतंाना गावातील लोकांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना लोकांनी पकडून ठेवले असे चौकशीअंती निष्पन्न झाले.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक गडचिरोली  नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता  तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली  चामोर्शी येथील प्रभारी अधिकारी विश्वास पुल्लरवार, बालाजी लोसरवार,  दुर्योधन राठोड, राधा शिंदे, राजेश गणवीर,  व्यंकटेश येल्लला यांनी पार पडली. या घटनेत शहरातील नागरिकांनी सतर्कता बाळगत तीन संशयीत इसमांना पकडून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अशाच प्रकारचे सहकार्य नागरिकांनी करावे असे आवाहन मा. पोलीस अधीक्षकांनी सर्व जनतेला केले आहे.

हे पण वाचा :-

cahmorshi choriChamorshi Policegadchiroli police