चायनीज नॉयलॉन मांजामुळे व्यक्तीचा गळा चिरला!

यवतमाळ मधील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

यवतमाळ, दि. १८ जानेवारी :  यावतमाळ मध्ये चायनीज नॉयलॉन मांजामुळे एका व्यक्तीचा गळा चिरला असून दुसऱ्याची बोटं चिरली आहे. महावितरण मध्ये उपव्यवस्थापक असलेले राजेंद्र मांडवकर व नरेंद्र करपते हे दुचाकीने कोषागार कार्यालयात जात असताना जिल्हाधिकारी यांचे शासकीय निवसस्थानाजवळ अचानक पतंगीचा चायनीज नॉयलॉन मांजा आडवा आल्याने मांडवकर यांचा गळा चिरल्या गेला. त्यामुळे त्यांचे वाहन अनियंत्रित झाले यावेळी दुचाकीवर मागे बसलेले करपते यांनी मांजा काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे एक बोट चिरल्या गेले.

दरम्यान करपते यांनी जखमी राजेंद्र मांडवकर यांना सोबत घेऊन खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, जखमी नरेंद्र करपते यांच्यावर देखील उपचार करण्यात आले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध चायनीज मांजा विक्री होत असून तो पक्षी व मानवासाठी धोकादायक ठरत आहे.

हे देखील वाचा : 

लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल प्रकाशित ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध

नारी शक्ती पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज आंमत्रित

 

 

lead news