लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि ३१ मार्च : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात चितळाची शिकार करून मांस घरी नेवून शिजवित असल्याची गोपनीय माहिती वनअधिकारी यांना मिळताच वनअधिकार्यांनी मोठ्या शिताफीने “त्या” आरोपींना त्यांच्या घरी शिजविलेल्या मांसासह घरून ताब्यात घेत शनिवार ३० मार्च रोजी गिलगाव (जमीनदारी) येथे चार आरोपीना अटक करण्वियात यश आले .
या मध्ये आरोपी पंकज पिंपळवार याला कुनघाडा रै. वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून चौकशी करून त्याचा कबुली जबाब नोंदविला. यावेळी त्याने अरुण विठ्ठल भोयर, रोहिदास शंकर मडावी दोघेही रा. गिलगाव (जमीनदारी) व विलास काशिनाथ बोदलकर रा. बांधोना आदींचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे सांगितले. इतर सर्व कार्यवाही पूर्ण करून आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यातील पंकज, अरूण व रोहिदास यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी तर विलास बोदलकर यास एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली वन विभागाचे सहायक वनसंरक्षक धीरज ढेंबरे, वन परिक्षेत्र अधिकारी एम. एम. तावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहायक एस. जी. झोडगे, वनरक्षक के. एम. मडावी हे करीत आहेत. या कारवाईसाठी अन्य वन कर्मचारी व वनाधिकान्यांचे सहकार्य लाभले.
हे देखील वाचा ,