अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरनातील हवालदारास पोलिस कोठडी

पोलीस हवालदाराचे निलंबन अटळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : पोलिस हवालदार श्री. बंडू गेडाम, वय ५२ रा. नवेगाव ता.जि. गडचिरोली याने अल्पवयीन मुलीवर केलेल्या  लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक करून न्यायालयात हजर केले असता  सदर  पोलिस हवालदारास न्यायालयाने ६ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बंडू गेडाम पोलिस हवालदार याने अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्याबाबत  पीडित मुलीच्या आई-वडिलांनी गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये २ डिसेंबर रोजी  तक्रार दाखल केली. सदर तक्रारीचे अनुषंगाने  गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय जगताप यांनी तपास करून  तपासानंतर २ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत आरोपी बंडू गेडाम याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली व दि. ३ डिसेंबरला आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून सदर पोलीस  हवालदाराचे निलंबन होणे अटळ आहे. वरील प्रकरणाचा तपास गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय जगताप हे करीत आहेत.

 

हे पण वाचा,