माजी नगरसेवकाच्या मुलावर जीवघेणा हल्ला

चांदुर रेल्वेतील तहसील कार्यालयासमोरील घटना.. मारेकरी पसार..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अमरावती, दि. १२ जून :  चांदुर रेल्वे शहरात माजी नगरसेवकाच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. चांदुर रेल्वेच्या मुख्य रस्त्यावरील तहसील कार्यालयासमोरील ही घटना आहे. ११ जूनला रात्री ८ वाजता दरम्यानची ही घटना आहे. या हल्ल्यात माजी नगरसेवक यांचा आर्यन कलावटे मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

आर्यन हा तहसील कार्यालयासमोर चायनीज चाखण्यासाठी गेला असताना, अचानक त्याच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आल्याची माहिती आहे.हल्ला केल्यानंतर मारेकरी पसार झालेत. आर्यन गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.प्रकृती गंभीर होत असल्याने त्याला अमरावती हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. सद्या पोलीस मारेकरूंचा शोध घेत आहेत.

 

 

lead news