लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मीराभाईंदर च्या रस्त्यावरील नो पार्किंग मधील जागेत चार चाकी गाडीला जॅमर लावला म्हणून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांना “आपकी वर्दी निकालो यही मारता हू तेरे को बिच मे से चिर देता हू” म्हणत पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या अरुण रतन सिंह आणि त्याच्या पत्नीचं नाव मीना अरुण सिंह आहे. हे दोघे पती पत्नी मीरा रोडच्या रामदेव पार्क या परिसरातील राहणारे आहेत.
पोलिसांशी हुज्जत आणि शिवीगाळ करणंं या दाम्पत्याला चांगलच महागात पडलं आहे. दोघे पती-पत्नी वर मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी अरुण रतन सिंह याला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
हे देखील वाचा :
“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?
ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे – नवाब मलिक