पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरच दोन गटात फायटर ने हाणामारी ; दोन कुटूंबीय भिडले एकमेकांसमोर 

जळगावात कायद्याचा धाक संपला;

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जळगाव, दि. १६ जुलै : कौटुंबिक कलहातून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना आज पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समिती समोर घडली

पोलिसांसमोरच फायटर ने एकमेकांत हाणामारी झाली. विशेष म्हणजे पोलिसांसमोर ही घटना घडल्याने कायद्याचा धाक आहे का संपला का असा सवाल उपस्थित होतोय.

जामनेर तालुक्यातील वाकोद येथील तरूणीचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील तरूणाशी चार महिन्यांपुर्वी झालेला होता.

सुरूवातीचे दोन महिने संसार चांगला चालला. काही दिवसांनंतर दोघांमध्ये खटके उडाले. त्यानंतर संबंधित तरूणीने जळगाव येथील महिला दक्षता समितीकडे तक्रार दाखल केली.

आज दोन्ही गटातील मंडळी पोलीस अधिक्षक कार्यालयात जमली होती.

दक्षता समितीमधून बाहेर पडल्यानंतर दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

या हाणामारीत फायटर सारख्या वस्तूचा देखील वापर झाला.हा प्रकार पोलिसांसमोर घडला. या हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

दोघांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

बेघर निवारा गृहात अंध जोडप्याचे शुभ मंगल

भूजल संपत्तीचे जतन व संवर्धन होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईत रात्रभर पाऊसाने मध्य रेल्वे ठप्प, रस्ते वाहतुकीवर ही पावसाचा परीणाम

 

jalgaonlead story