चार पोलीस कर्मचारी अडकले ACB च्या जाळ्यात

दहा हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले रंगेहात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वाशिम, दि. १७ जून : वाशीम जिल्ह्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना दहा हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून अटक केली आहे.

अवैध दारू विक्री व जुगाराचा धंदा सुरळीत चालू ठेवण्यासाठी हप्ता म्हणून दहा हजार रुपये देण्यासाठी पोलीस कर्मचारी गणेश भगवान बर्गे, दिनेश कांतीलाल राठोड, रमेशराव चव्हाण, केदारेश्वर फुलूउंबरकर यांनी तगादा लावला होता. तक्रादाराला हप्ता द्यायचा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे तक्रार दिली होती, त्यावरून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.

आरोपी पोलीस कर्मचारी गणेश बर्गे हे तक्रारदाराला वारंवार रेड टाकण्याची भीती घालत होते तर केदारेश्वर फुलउंबरकर हे बिट जमदारा मार्फत ठाणेदारांना भेटण्यासाठी तगादा लावून, हप्ता पोलीस स्टेशनला जमा करण्यास सांगत होते.

lead news