घरातच कोंडून ११ बाल कामगारांकडून घेत होते काम; बाल संरक्षण कक्षाने केली बालकांची सुटका

बालकांना जेवणही मिळत नसल्याचे आले समोर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, दि. १७ जुलै: झारखंड येथील तब्बल ११ बाल कामगारांना घरात कोंडून ठेवत त्यांना उपाशी ठेवण्याचा हा प्रकार वर्धा जिल्ह्यातील कंत्राटदारांकडून घडला असल्याचे समोर आले आहे.

बोरीबारा येथील पाईप्स तसेच रस्ते बनविणाऱ्या कंपनी असलेल्या कॅम्प बी मध्ये हे बाल कामगार कामावर होते. त्यांना घरातच कोंडून ठेऊन त्यांच्याकडून काम करवून घेत असल्याची बाब उजेडात येताच बाल संरक्षण कक्षाने दखल घेतली आहे. पोलिसांच्या मदतीने तब्बल ११ बाल कामगारांना कंत्राटदारांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. पोलीस विभाग व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी संयुक्तरित्या हे रेस्क्यू ऑपरेशन राबविले आहे.

रसुलाबाद नजीकच्या बोरीबारा परिसरात रस्त्याच्या कामावर काही अल्पवयीन मुले असल्याची माहिती बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. झारखंड येथून कंत्राटदारांनी हे अल्पवयीन मजूर कामावर आणले होते. तब्बल ११ मुलांना बोरीबारा येथील कंपनी मध्ये जितू आणि कार्तिक नावाच्या ठेकेदाराने कोंडून ठेवले आहे.  त्यांना जेवण दिल्या जात नाही व पगार देखील देत नाहीत. अशी तक्रार नागपूर येथील डीसीपीओ ला प्राप्त झाली होती.

ही तक्रार वर्ध्याच्या बाल संरक्षण कक्षाकडे पाठविण्यात आली. बाल संरक्षण कक्षाने यात पुलगाव पोलिसांची मदत घेऊन तक्रारीत नमूद केलेल्या मुलांचे फोन नंबर वरून प्रकरणाची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबवित मुलांची सुटका करण्यात आली. कंत्राटदारावर बाल कामगार कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुलगाव ठाणेदार गायकवाड यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन मध्यरात्री दरम्यान राबविले आहे.

हे देखील वाचा :

…या गावात मादी बिबटयासह तिच्या पिल्यांचे वावर; वनविभागाने दिला सतर्कतेचा ईशारा

नागेपल्ली येथील पोलीस कर्मचारी हत्याप्रकरण: पत्नी व मुलीनेच रचला हत्येचा कट, सुपारी देऊन केली हत्या

खा. अशोक नेते यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप

balkamgarlead storywardha