आयशर टेम्पोच्या धडकेत महामार्ग पोलीस जागीच ठार , वरवडे टोल नाक्याजवक घडली घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क ०६ डिसेंबर : – सोलापूर पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्या नजीक आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत महामार्ग पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला. मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव सागर औदुंबर चौबे आहे.

मोडनिंब महामार्ग पोलीस गस्त पथक हे वरवडे टोल नाका नजीक थांबलेले असताना
हैदराबादहुन मुंबईला निघालेला आयशर टेम्पोने समोर आलेल्या महामार्ग पोलीस पथकातील पोलीस नाईक सागर औदुंबर चौबे यांना धडक दिली. या घटनेत चौबे जागीच ठार झाले. टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.