लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
वर्धा : जिल्ह्यातील बहुचर्चित हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणात दोन्ही बाजूने होणारा युक्तिवाद संपल्याने न्यायालयात कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबली होती. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकरणाचा निकाल न्यायालय सुनावणार आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीने गुन्हा केला की नाही हे आता न्यायालय ठरवणार असल्याची उज्वल निकम यांनी सांगितले.
३ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपी विकेश नगराळे याने अंकितावर (शिक्षिका) पेट्रोल ओतून पेटविले होते. त्यानंतर १० फेब्रुवारीला उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यासह देशात खळबळ माजली होती. या प्रकरणात शासनाने उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती.
घटनेपासून आरोपी विकेश नगराळे कारागृहात आहे. आतापर्यंत प्रकरणात २९ साक्षीदार तपासण्यात आले आहे. पुढे सरकारी वकील उज्वल निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधत असतांना म्हणाले की, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल असे मला वाटते. उपजिल्हा न्यायालयात आज सरकारी वकील उज्वल निकम व आरोपीचे वकील भुपेंद्र सुने यांनी आप आपली बाजी मांडली.
हे देखील वाचा :
नक्षल्यांनी रस्त्याचे बांधकाम करत असलेल्या वाहनाची केली जाळपोळ…
स्फोटात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; वेल्डींग करतांना कंपनीत झाला भीषण स्फोट