पत्नीने चारित्र्यावर संशय घेतल्याने पतीची आत्महत्या..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  तालुक्यातील मौजा दिभना  येथे  विवेक पुंडलिक भरडकर, वय ३५ वर्ष  रा. गोगाव याने दि. २४ नोव्हेंबर रोजी गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला होता.

विवेक पुंडलिक भरडकर, वय ३५ वर्ष  रा. गोगाव यांचा विवाह निमगाव  त. सावली जि. चंद्रपूर येथील अल्का हिच्याशी झाला होता. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी पती पत्नीत वाद होऊन पती  १७ नोव्हेंबरला रोजी  कामासाठी बाहेर गावी  गेला. परंतु  गडचिरोली  तालुक्यातील  दिभना  येथे  एका तरुणाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला होता.

सदर प्रकरणात  एक महिन्यानंतर नवा द्विस्ट आला. पत्नी सतत पतीच्या  चारित्र्यावर संशय घेत असल्याने आत्महत्या करत असल्याचा मृताचा एक व्हिडिओ समोर आल्याने  सासऱ्याच्या फिर्यादीवरुन आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुनेविरुध्द २५ डिसेंबरला गडचिरोली पोलीस स्टेशन मध्ये  गुन्हा नोंद झाला.

हे ही वाचा,

आलापल्ली शहरात अमित शहा यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद..

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नामंकित इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश

जुनी पेन्शन योजना लागू करा

 

दि. २४ नोव्हेंबर रोजी गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळलापत्नी सतत पतीच्या  चारित्र्यावर संशय घेत असल्याने आत्महत्या करत असल्याचा मृताचा एक व्हिडिओ समोर