आरमोरी येथील काँग्रेसच्या माजी आमदार पुत्राची वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हातापाई… व्हिडिओ वायरल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी : कॉंग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लारेन्स गेडाम याने आरमोरी शासकीय कोवीड सेवा केंद्रावरील कर्तव्यावर असलेले डॉ अभिजित मारबते यांना आज मारहाण केली आहे. त्यामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एक दोन दिवसांपूर्वी देवळी चे आ. रणजित कांबळे यांचे वर्धा च्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फोनवरून अपशब्द वापरून केलेले संभाषण ताजे असतांनाच काँग्रेसच्या माजी आमदार पुत्राने सरळ कोरोना बाधितांच्या सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हात उचलणे कशाचे द्योतक आहे?

https://secureservercdn.net/160.153.137.99/a79.93f.myftpupload.com/wp-content/uploads/2021/05/VID-20210512-WA0090.mp4?time=1620842038

या आधीही या माजी आमदार पुत्राने विधानसभा निवडणुक काळात प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या अपहरण च्या गुन्ह्यात फरार होते .येन केन प्रकारें हे प्रकरण शमते न शमते तोच हे प्रकरण झाल्याने महाविकास आघाडी च्या सरकार मध्ये झुंडशाही ला वाव मिळतो आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

आरोपीला पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. आयपीसी आणि महाराष्ट्र शासन सेवा सेवा कर्मचारी आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार आणि नुकसान किंवा मालमत्ता हानीचा प्रतिबंध) अधिनियमातील कठोर, अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा नोंदविला जात आहे.