धक्कादायक! ‘प्रेम’ प्रकरणाचा ‘अंत’ प्रेयसीच्या खुनाने.दहा वर्षापासून सुरू होते ‘प्रेम’.

प्रेयसीच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार करुन केला अंत ..चंद्रपूरातील जुनोना येथील घटना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर:- ‘प्रेम’ प्रकरणाचा ‘अंत’ प्रेयसीच्या खुनाने केला. दहा वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाचा अंत प्रेयसीच्या खुनाने झाला. ही घटना चंद्रपूर शहरातील जुनोना चौक परिसरात उघडकीस आली आहे. दुर्गा उमरे असे मृत महिलेचे नाव आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी राकेश ढोले स्वतः विवाहित असून दोन लेकराचा बाप आहे. मात्र त्याचे विवाहाच्या आधीपासून दुर्गा उमरे हिच्याशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतर दिर्घकाळपर्यंत दोघांमध्ये वाद-विवाद होत होते. आज सकाळी दुर्गा उमरे हिने आरोपीला स्वतःच्या घरी बोलावले. त्यावेळी पत्नीलाही माहिती मिळाली आणि त्या ठिकाणी मृत दुर्गा च्या घरीच  तिघा मध्ये कडाक्याचे भांडण झाले.

या भांडणादरम्यान आरोपी राकेश ढोले याने घरातच असलेल्या एका लाकडी दांडक्याने दुर्गा उमरे हिच्या डोक्यावर वार केल्याने  दुर्गा घरातच गतप्राण झाली. यानंतर आरोपी घटनास्थळावरून रामनगर पोलीस ठाण्यात स्वतः हजर होवून झालेली घटना सांगीतली लगेच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले . परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी राकेश ढोले यास तातडीने ताब्यात घेत गुन्हा नोंद केला. प्रकरणाचा तपास रामनगर पोलीस करीत आहे.