लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १३ जुलै : कल्याणातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी ८ कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉईस कार विकत घेतल्याने चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत. त्यांच्या विरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने. कल्याण पूर्व येथील एका इमारतीमध्ये वीज चोरीचा आरोप करत महावितरण ने त्यांच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
जवळपास ३४ हजार ६४० रुपये वीज चोरी झाल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महावितरणकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गायकवाड यांनी सदर रकम भरली असल्याचं महावितरण कडून सांगण्यात आले आहे.
महावितरणच्या भरारी पथकाने कल्याण पूर्व विभागातील कोळसेवाडी, आमराई तिसगाव भागात बांधकामाच्या ठिकाणी तपासणी केली असता वीजमीटर टाळून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळून आले. मार्च मध्ये ही तपासणी करण्यात आली होती. रीतसर पंचनामा करून चोरीच्या विजेचे ३४ हजार ८४० रुपयांचे देयक व १५ हजार रुपयांची तडजोड रक्कम भरण्याबाबत वीज वापरणाऱ्या संजय गायकवाड यांना कळवण्यात आले. मात्र पुरेसा कालावधी देऊनही वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम न भरल्याने महावितरण ने संजय गायकवाड यांच्याविरोधात कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीजचोरीची तक्रार दाखल केली होती.
या तक्रारी नुसार गायकवाड यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांनी वीजचोरीचे ३४ हजार ८४० रुपयांचे देयक व तडजोडीची १५ हजार रुपयांची रक्कम त्यानी सोमवारी महावितरणकडे भरली आहे.
हे देखील वाचा :
सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकरण : आंदोलनप्रकरणी आठ जणांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल
धक्कादायक!! गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू!
“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?