नागेपल्ली येथील पोलीस कर्मचारी हत्याप्रकरण: पत्नी व मुलीनेच रचला हत्येचा कट, सुपारी देऊन केली हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १७ जुलै : भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जगन्नाथ सिडाम (५३) यांची ४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास नागेपल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती.

या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या हत्याकांडाचा तपास अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर करीत आहेत.

या हत्याकांडाचा उलगडा पोलीस चौकशीवरून झाला असून पोलीस हवालदार सिडाम यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नी व मुलीचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. सुपारी किलरद्वारे सिडाम यांची हत्या करण्यात आली आहे.

याप्रकरणात पोलीसांनी मृतकाची पत्नी,  मुलगी आणि एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी दोन आरोपीचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती प्रकरणाचे तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिली आहे.

हत्येचे गुढ कायम !

पोलीस हवालदार सिडाम यांच्या हत्येचे मुख्य सुत्रधार त्यांची पत्नी व मुलगी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पत्नीने कोणत्या कारणास्तव पतीच्या हत्येचे कटकारस्थान रचून हत्या घडवून आणली याबाबत अधिकृत माहिती पोलीस सुत्रांकडून प्राप्त झालेली नाही.

 

संबंधित बातमी : 

पोलिस हवालदाराची (वाहनचालकाची) धारदार चाकूने गळा कापून हत्या!

हे देखील वाचा :

आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

बेघर निवारा गृहात अंध जोडप्याचे शुभ मंगल

 

 

lead storynagepalli murder case