बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड

मुख्य सूत्रधार सोनू शिंदे व सहकारी जेरबंद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नंदुरबार डेस्क 24 मे:- विवाह म्हणजे नुसतेच दोन जीवांचे मनोमिलन नसून दोन परिवारांचे विश्वासाचे नातं होय,  अशातच जर विश्वासघात होत असेल व नात्यातील गुंतागुंत होत असेल तर मात्र सारेच असह्य होते असाच प्रकार घडला आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाणा गावातील सैंदाणे परिवारासोबत !!! बनावट लग्न लावून आठ दिवसाच्या आतच पैसे व दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या टोळीतील वधू सह इतर चौघांना शहादा पोलिसांनी सापळा रचून बेटावद येथे गजाआड केले आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की मंदाणा येथील भूषण सैंदाणे याचा विवाह एका दलालाच्या मध्यस्थीने हिंगोली येथील सोनू राजू शिंदे या मुलीशी लावून देण्यात आला. मुलीशी लग्न लावून देण्यासाठी १ लाख ३० हजार रुपये बाबाराव आमले रा. औरंगाबाद या दलालाने सैंदाणे परिवाराकडून घेतले. लग्नाच्या सात दिवसानंतर वधुने दागिने व रोकड रकमेसह पोबारा केला म्हणून सदरची तक्रार सैंदाणे परिवाराने पोलीस स्टेशन असलोद येथे केली होती. यानंतर बेटावद येथील सैंदाणे यांचे नातेवाईकाने तुझ्या पत्नी सारख्या दिसणार्या मुलीचा विवाह बेटावद येथील कपीलेश्वर मंदिरावर होत असल्याची माहिती दिली.

या माहितीच्या आधारे शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक परदेशी व शिपाई साळुंखे यांनी बेटावद जवळील पडद्यावर येथे सापळा रचत बनावट लग्न करून फसवणूक करणाऱ्या सोनू शिंदे व तिच्या सहकारी टोळीला जेरबंद केले आहे. पोलिसांच्या तपासात सोनू शिंदे हिने आतापर्यंत 13 मुलांना फसवले आहे. फसवणूक करून विवाह योग्य तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाआड करून अनेकांचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवले आहे.

crimemarraige brokerNadurbar