पोलीस- नक्षल चकमकीत C60 जवानांनी दोन नक्षल्यांना घातले कंठस्नान गडचिरोली पोलिसांना मोठे यश..

पोलीस- नक्षल मध्ये चकमकीत जवानांनी दोन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना मोठे यश आल्याची प्राथमिक माहीती..C 60 जवान सर्चिंग ऑपरेशन अधिक तीव्र केले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

 

गडचिरोली दी.१३ में :- धानोरा तालूक्यातील सावरगांव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या मोरचुल जंगल परिसरात आज सकाळी C ६० पोलिस जवान आणि नक्षवादयामध्ये चकमक उडाली या चकमकीत दोन नक्षल्याना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले असल्याची प्राथमिक माहिती  आहे. 

C ६० जवानानी चकमकी नंतर  शोध मोहीम अधिक तीव्र केल्यानंतर  शोध घेत असतांना घटनास्थळीं  दोन नक्षलवाद्यांचे मृतशव हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे या घटनेत मारले गेलेले नक्षल हे   महिला कि पुरुष आहेत यांची माहिती अद्याप प्राप्त झाली नसली तरी  घटनास्थळी रक्ताचा मोठ्या प्रमाणात  सडा  असल्याने जखमी आणी मृतकांची संख्या जास्त असल्याची शक्यता पोलिस सूत्राकडून  व्यक्त करण्यात येत आहे . जंगलातील शोध मोहीम नतरच अधिक घटनेची माहिती पोलीस विभागाकडून  प्राप्त होणार आहे .

 सावरगांव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या मोरचुल जंगल परिसरात नक्षल असल्याची माहिती पोलिसाना प्राप्त झाली. होती  त्याच  मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज  सकाळ पासूनच  नक्षल शोध मोहीम राबविण्यात आली होती  आणि अचानकच शोध मोहीम  सुरु असताना सात च्या सुमारास आज जंगलात दबा धरून बसलेल्या  नक्षल्यांनी C ६० जवानांवर अंदाधुंद  गोळीबार केला .त्यावेळी C ६० पोलिस जवानानी जशास तसे प्रतिउत्तर दिले.  हि चकमक जवळपास तास भर चालली .मात्र  C ६० जवानाचा वाढता दबाव पाहून जंगलाचा फायदा घेत नक्षल जंगलात पसार झाले.  घटनास्थळी C ६० पोलिस जवानांनी  शोध मोहीम अधिक तीव्र केले असुन नक्षल च्या दोन मृतदेह हस्तगत  केल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून माहिती  आहे.

 

 एटापली तालुक्यातील जांबीया गट्टा पोलीस ठाण्यावर नक्षलवाद्यांकडुन दि.११ में रोजी रात्री १२ च्या सुमारास गोळीबार करण्यात आला मात्र रात्री तैनात असलेल्या जवानांनी गोळीबाराला जोरदार प्रतिउत्तर दिले .मध्यराञीच्या सुमारास गोळीबार करुन जवानाना सापडयात अडकवण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न होता माञ पोलीसांच्या सतर्कतेमुळे फसला..

 पोलीस अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार तीन ते चार राउंड गोळीबार नक्षलवाद्यानी केला. ठाण्यात  तैनात असलेल्या पोलिसांचा वाढता  दबाव पाहून जंगलाचा फायदा घेत नक्षल जंगलात पसार झाले.घनदाट जंगल अतिदुर्गम भाग असलेल्या या पोलीस ठाण्याला लक्ष्य करण्याचा नक्षलवाद्यांनी एका महीन्यात दुस-यांदा प्रयत्न केला आहे. गेल्या महीन्यात पहीला हल्ला झाल्यानंतर आठ दिवसातच या भागात दोन माओवाद्यांना ठार करण्यात आले होते.

त्यानंतर आज दि .१३ में रोजी  धानोरा तालूक्यातील सावरगांव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या मोरचुल जंगल परिसरात आज सकाळी C ६० पोलिस जवान आणि नक्षवादयामध्ये चकमक उडाली या चकमकीत दोन नक्षल्याना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले.

 

 

@loksparshnews@spgadchiroli