लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली ६ ऑगस्ट : कुरखेडा तालूका मूख्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी या गावातील सार्वजनिक विहीरीत आज ६ आगस्ट शूक्रवार रोजी सकाळी नवजात अर्भक पाण्यात तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आज सकाळी गावातील लहान मूले विहीरीजवळ खेळत असताना अचानक विहीरीकडे लक्ष गेले त्यावेळी त्यांना काही तरी वस्तू तरंगताना दिसून आली . लगेच मुलांनी सदर माहिती गावकरी लोकांना दिली असता विहिरीत बघितले असता त्याना ते नवजात अर्भक असल्याचे निदर्शनात आले लगेच याची माहिती वाकडीच्या पोलीस पाटलानी कूरखेडा पोलीस स्टेशनला दिली ठाणेदार सूधाकर देडे यानी घटनास्थळावर पोहचून पंचनामा केला व मृत अर्भकाला ताब्यात घेत चौकशी सूरू केली आहे.
रात्रीच्या सूमारास अज्ञात आरोपीने अनैतिक संबधातून जन्माला आलेल्या अर्भकाला विहीरीत फेकले असावे असा अंदाज व्यक्त केला आहे. सदर विहीरीचे पाणी गावकरी पिण्यासाठी वापर करीत असतात व येथेच अर्भक फेकण्यात आल्याने गावकर्यात मोठा असंतोष पसरलेला तसेच मृत अर्भकाबाबत लोकामध्ये तर्क-वितर्क लावण्यात येत आहे. कूरखेडा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपी विरोधात गून्हा दाखल करण्यात आला असून कुरखेडा पोलीसा कडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
हे देखील वाचा :
कमलापूर हत्ती कॅम्प मध्ये अडीच वर्षाच्या अर्जुन हत्ती चा मृत्यू.!.
वारे पठ्या!! शाबास ! कुस्तीत भारताचा बजरंग पुनिया उपांत्य फेरीत