पोलिस हवालदाराची (वाहनचालकाची) धारदार चाकूने गळा कापून हत्या!

नागेपल्ली येथील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली : पोलीस हवालदाराची (वाहनचालक) अज्ञातानी धारदार चाकूने गळा कापून राहत्या घरी नागेपल्ली येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये काल रात्रौ हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जगन्नाथ सिडाम (५३) असे हत्या झालेल्याचे नाव आहे.  ते भामरागड़  तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्रात कार्यरत होते.

काल रात्रौ ते नागेपल्ली येथील आपल्या राहत्या घरी झोपून असतांंना अज्ञात मारेकरूने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून त्यांना उठविले व काही कळायच्या आतच धारदार चाकूने त्यांचा गळा कापला त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. चंद्रपुर येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनास्थळी अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी, विशाल ठाकुर,पोलिस निरीक्षक प्रविण डांगे आणि श्वान पथकासह दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

हे देखील वाचा :

मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यानी ४० हजाराचा ऐवज केला लंपास

तब्बल ३५ लांखांचा गुटखा जप्त करण्यात पोलिसांनी मिळाले यश

MPSC उत्तीर्ण, पण दीड वर्षांपासून नोकरी नाही; … या नैराश्यातून विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल!
crimelead storyNagepalli