भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण प्रकरणी जालन्यातील कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन निलंबित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना : शहरातील एका भाजपा कार्यकर्त्याला झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना निलंबित केले आहे.

याप्रकरणात यापूर्वीच एका पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना या जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी निलंबित केलेले आहे.

भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी शिवराज नारीयावाले यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवराजवरील मारहाणी संदर्भात विशेष पोलिस महानिरीक्षक प्रसन्ना यांची भेट घेऊन पोलिस निरीक्षक महाजन व पोलिस उपअधीक्षक यांना निलंबन करून तात्काळ कारवाईची औरंगाबाद येथे भेटुन मागणी केली होती.

विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कारवाई केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेवून कारवाई न केल्यास दरेकरांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल दरेकरांनी ट्विट करून समाधान व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा :

मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी ५ एकरची द्राक्ष बाग काढून वडिलाने बनवले राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान

मोठी बातमी : ‘एसईबीसी’ तील पात्र लाभार्थ्यांनाही मिळणार ‘ईडब्ल्यूएस’ चा लाभ

 

Jalna Kadim Police stationlead story