१२५ जणांचे हरवलेले मोबाईल शोधून देण्यात नागपूर सायबर सेलच्या पोलिसांना यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क : मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळी दिनचर्या या मोबाईल भोवती गुंतलेली असते. मग ते कोरोनाच्या काळातील ऑनलाईन शिक्षण असो की बँकांचे व्यवहार सगळी कामे या मोबाईलची एकरूप झालेली असतात. पण तोच मोबाईल जर चोरिला व गहाळ झाला तर….

प्रत्येक जण या कारणाने अस्वस्थ होतो. त्याची दिनचर्या कोलमडते. हल्लीच्या जमान्यात तर मोबाईल परत मिळण्याची आशाच अनेकजण सोडून देतात. अशाच अडचणीत सापडलेल्या १२५  नागपूरकरांना मात्र हरवलेला किंवा चोरी झालेला फोन परत मिळालाय.  नागपूर पोलिसांच्या सायबर सेल न त्यांचा हा मोबाईल शोधून आणत त्यांच्या हवाली केला. अनपेक्षित समाधान कारक मिळालेल्या या धक्क्याने नागपूरकर मात्र सुखावले आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार,  गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी,  पोलिस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मसाळ यांच्या हस्ते या १२५ नागरी नागपूरकरांना त्यांचा मोबाइल सुपूर्द करण्यात आला.

मोबाईल गहाळ झालेल्या या १२५ नागरिकांना त्यांचा मोबाईल परत देण्याच्या औपचारिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अशोक बागुल यांनी केले.

हे देखील वाचा :

३५० सायलेंसर आणि प्रेशर हॉर्न्स वर फिरला बुलडोजर; ठाणे वाहतूक विभागाची धडक कारवाई

भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, अपघातात चौघांचा मृत्यू

 

cyber cell nagpurlead story