ऑनलाइन सट्टावर पोलिसांची धाड! ३०,०९,४१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोंदिया, दि. २७ ऑक्टोंबर :  सध्याचे युग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे अवैध धंद्यातही या तंत्रज्ञानाचा व आधुनिक उपकरणांचा उपयोग करून गैरमार्गाने कोट्यवधीची माया साठविली जात आहे.

गोंदिया जिल्हातील तिरोडा शहरात ऑनलाईन मोबाईल सट्टा जोमात सुरू आहे. त्यातच तिरोड्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. ऑनलाईन मोबाईल सट्टा अड्ड्यावर तिरोडा पोलिसांनी छापा मारून 4 आरोपींना अटक केली आहे. तर ३० लाख ९ हजार ४१२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत त्यांना शास्त्री वॉर्ड तिरोडा ऑनलाईन मोबाईल सट्टा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. शास्त्री वॉर्डातील मनोहर तरारे हा आपल्या घरी घराच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावून, तसेच घराच्या समोरील दाराला बाहेरून कुलूप लावून वरच्या माळ्यावर ऑनलाईन मोबाईलवर सट्टा लावून जुगार खेळवित होता. यात चार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा :

आदिवासी बांधवांबरोबर बसून प्रश्न जाणून घेता आले – राज्यमंत्री तनपुरे

नागरीकांच्या शासकीय योजनेत जिल्ह्याला झुकते माफ देणार – राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे

 

online bettingpolice raid