चोरी झालेले ५३ मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : सध्या सायबर गुन्हाचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगार लोकांना  वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक करीत आहे. गडचिरोलीमध्ये माहे सप्टेंबर २०२४ ते डिसेंबर २०२४ या चार महिन्यांच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या ५३ मोबाईलचा शोध  जिल्हा पोलीसाकडून घेण्यात आला.

जिल्ह्यात सध्या पोलिस स्थापना दिवस सुरु आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. गर्दीत चोरट्यांनी लांबविलेले व नागरिकांकडून यात्रा, बाजारात हरवलेले साडेआठ लाख रुपये किमतीचे ५३ मोबाइल शोधण्यात पोलिसांच्या सायबर विभागाला यश आले.

वर्ष २०२४ मध्ये १९ लाख ३१ हजार ९१२ रुपये किमतीचे ११९ मोबाईलचा शोध पोलीस विभागाकडून घेण्यात आले.  तर सप्टेंबर २०२४ ते डिसेंबर २०२४ या चार महिन्यांच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या अंदाजे किंमत ८ लाख ५५ हजार ५६१ रुपये किमतीचे ५३ मोबाईलचा शोध घेऊन ७ जानेवारी रोजी सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते सुपुर्द करण्यात आले आहे. सदरची कारवाई सायबर ठाण्याचे पो.नि. अरुण फेगडे, उपनिरीक्षक नेहा हांडे, हवालदार वर्षा बहिरवार, अंमलदार सगनी दुर्गे, संजीव लेंडगुरे, दिवाकर तनमनवार यांनी  केली.

सायबर गुन्हेगार लोकांना  वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक करीत असून  डिजीटल अरेस्टद्वारे व आर्टीफिशीयल इंटीलेजन्स (AI) च्या सहाय्याने कोणाच्याही संवेदनशील फोटोंना एडीट करुन लोकांची फसवूणक केली जाते, त्यामुळे जनतेने सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले.

हे ही वाचा,

सहाय्यक आरटीओ यास चारशे रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक

माकडाने केला तीन विद्यार्थ्यांवर हल्ला

महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री स्व मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त 10 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरात

 

वर्ष २०२४ मध्ये १९ लाख ३१ हजार ९१२ रुपये किमतीचे ११९ मोबाईलचा शोध पोलीस विभागाकडून घेण्यात आलेसायबर गुन्हाचे प्रमाण वाढत असुनसायबर गुन्हेगार लोकांना  वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक करीत आहे.