लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड, दि. २१ एप्रिल: नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील उप जिल्हा रुग्णालयात कोरोना वॉर्डात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
कोरोना वार्डात मोठ्याने बोलु नका म्हंटल्यावर रुग्णाच्या नातेवाइकाचा राग अनावर झाला आणि त्याने थेट चाकू घेऊन डॉक्टरवर धावून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी आरोपीचा हात धरून चाकू काढून घेतल्याने अनुचित प्रकार टळला असून आरोपी भाऊसाहेब गायकवाड याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा तसेच अन्य कलमानव्ये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीस मुखेड पोलिसांनी अटक केले आहे.