धक्कादायक! अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू, प्र. कुलगुरू यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार

डॉट कॉम इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडला ७२ लाखांचे दिलेले कंत्राट बेकायदेशीर असल्याचा आरोप.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विविध विभागाचे कामकाज ऑनलाइन होण्यासाठी डॉट कॉम इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडला ७२ लाखांचे दिलेले कंत्राट बेकायदेशीर असल्याचा आरोप करत यात कुलगुरू मुरलीधर चांदेकर प्र. कुलगुरू राजेश जयपुरकर यांनी पदाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी विद्यापिठाचे निलंबित सिनेट सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी केली आहे.

त्यांनी अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आरोप केला की, कुलगुरु व प्र. कुलगुरू यांनी कलम १४(७) चा दुरुपयोग करून डॉट कॉम या मर्जीतील कंपनीला ७२ लाख रुपयांचे बेकायदेशीर कंत्राट दिले, त्यामुळे या ७२ लाखांच्या बेकायदेशीर निविदा प्रकरणी पोलिसांनी तपास करून कुलगुरु विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी माजी सिनेट सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी केली आहे. तर पोलिसांनी सध्या प्रकरणं चौकशीत ठेवलं आहे, मात्र थेट कुलगुरूवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा :

खुनाच्या गुन्ह्याखाली पोलीस निरीक्षकांसह 3 जणांना अटक; महाराष्ट्राचं पोलीस हादरलं

येत्या 1 जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास महागणार

amravati universitycrimelead story