धक्कादायक!! युवा शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून चक्क विषप्राशन करून केली आत्महत्या!

युवा शेतकऱ्याने आपल्या मोबाईल मधून स्वतःची व्हिडिओ क्लिप बनवत केली आत्महत्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अकोला, दि. २० नोव्हेंबर : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत हिरपूर अंतर्गत येत असलेल्या मौजे साखरी येथील रहिवाशी युवा शेतकरी प्रवीण बाबुलाल पोळकट (३२) यांनी कर्जाला कंटाळून शेतात दिनांक १८ नोव्हेंबर ला दुपारी ४ वाजताच्या सुमारास  विषप्राशन केले होते. दरम्यान त्याला उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते. उपचारादरम्यान अकोला येथे १९ नोव्हेंबर च्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार  युवा शेतकरी प्रवीण बाबुलाल पोळकट  यांनी को. ऑप बँक तसेच महिंद्रा कोटक कंपनी कडून कर्ज घेतले होते.

यावर्षी झालेल्या नापिकीमुळे कर्जाचे हप्ते ते भरू शकले नाही म्हणून त्यांचा छोटा ट्रॅक्टर १८ नोव्हेंबर रोजी फायनान्स वाल्यांनी ओढून नेला. ही बाब त्यांच्या मनाला लागली.

याच विवंचनेतून त्यांनी १८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास विषप्राशन केले. गंभीर अवस्थेत त्याच्यावर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. १९ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यात त्यांनी रोहन काळे व महिंद्रा कोटक कंपनीचा उल्लेख केला असून त्यांच्या आत्महत्येस यांना जबाबदार धरण्यात यावे असे म्हटले आहे. रोहन काळे व महिंद्रा कोटक विरुद्ध कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली (एक ४ वर्षाची, एक २ वर्षाची) तसेच आजारी आई व वडील असा आप्त परिवार आहे.

हे देखील वाचा :

कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी

वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

पर्यावरण वाचविण्यासाठी दोन युवकांचा पुढाकार; जनजागृती करण्यासाठी सायकलने प्रवास

 

 

 

 

Akola districtlead newsSucide Caseyuva shetkari